
पुढे मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे सांगताना जुई म्हणाली, “‘ठरलं तर मग’ मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये सायली अर्जुनला मोदक कसे बनवायचे हे शिकवणार आहे. मोदकांवर आधारित संपूर्ण एक सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सेटवरच्या दादांना मी आधीच मोदक बनवायचे आहेत ही कल्पना दिली होती. पण, मोदक उकड काढून बनवतात याची कल्पना त्यांना नव्हती. मोदकांबद्दल फारसं कोणाला माहित नसल्याने मी सेटवर तांदळाच्या पीठाची उकड काढली, मालिकेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्हाला जवळपास बारा ते पंधरा मोदक हवे होते ते मी स्वत: बनवले. याशिवाय अर्जुन-सायलीच्या सीनसाठी लागणारे मोदक सुद्धा मीच बनवले होते.”










