Sunday, August 30, 2026
Homeफलटणखामगाव दुर्घटनेनंतर नगरसेवक विकास काकडे यांची शिंदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; शासन दरबारी...

खामगाव दुर्घटनेनंतर नगरसेवक विकास काकडे यांची शिंदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; शासन दरबारी पाठपुराव्याचे आश्वासन

खामगाव दुर्घटनेनंतर नगरसेवक विकास काकडे यांची शिंदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; शासन दरबारी पाठपुराव्याचे आश्वासन

फलटण | प्रतिनिधी फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे (सर) यांनी शिंदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना व्यक्त केली.

नगरसेवक विकास काकडे यांनी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला. अशा दुःखद प्रसंगात समाजाने एकजुटीने पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

खामगाव येथे ८ जुलै रोजी पहाटे झालेल्या दुर्घटनेत विजेचा शॉक लागून शिंदे कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी उपस्थित नागरिकांनीही शिंदे कुटुंबीयांना धीर देत आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संपूर्ण परिसरात आजही या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात असून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

यावेळी नगरसेवक विकास काकडे यांनी शिंदे कुटुंबाला शासनाकडून मिळणारी सर्व मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कठीण प्रसंगी आपण शिंदे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, तसेच शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments