Tharala Tar Mag 7th Oct: प्रतिमा आणि रविराज येणार का एकमेकांच्या समोर? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण!

0
18
Tharala Tar Mag 7th Oct: प्रतिमा आणि रविराज येणार का एकमेकांच्या समोर? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण!


गणपतीच्या मिरवणुकीत सायलीवर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर अर्जुनने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता. तिचा रक्तगट अगदीच दुर्मिळ असल्यामुळे तिचा जीव वाचवणे देखील कठीण झाले होते. मात्र, त्याचवेळी योगायोगाने हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रतिमाच रक्तगट जुळल्याने, तिने रक्तदान करून सायलीचा जीव वाचवला. मात्र, सायली आपलीच मुलगी आहे, या सत्यापासून ती अनभिज्ञ आहे. आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रतिमासमोर रविराज येणार आहे.



Source link