
सायलीला अचानक चक्कर येऊन कोरड्या उलट्या होऊ लागल्याने सुभेदार कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची कुजबुज सुरू झाली होती. सायलीचे मेडिकल रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आल्याने कल्पना तर पार आनंदून गेली होती. मात्र, हे रिपोर्ट्स खरे नाहीत आणि सायली प्रेग्नेंट नाही ही गोष्ट सायली, अर्जुन, अस्मिता आणि प्रिया यांना चांगलीच माहित आहे. तर, कल्पनाचा आजी होण्याचा उत्साह पाहून सायली आणि अर्जुनला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं आहे. आपल्यातलं नातं त्यांनी नेहमीच जगापासून आणि कुटुंबापासून लपवून ठेवलं होतं. मात्र, आता या प्रेग्नेंसीमुळे त्यांचं बिंग फुटणार आहे.








