Tharala Tar Mag 2nd Dec: सायली अर्जुनला समजावून सांगणार जोडीदाराचं महत्त्व! मालिकेत येणार नवा ट्विस्ट

0
17
Tharala Tar Mag 2nd Dec: सायली अर्जुनला समजावून सांगणार जोडीदाराचं महत्त्व! मालिकेत येणार नवा ट्विस्ट

अर्जुन आता पूर्णपणे सायलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र, त्याने याची कबुली अजूनही दिलेली नाही. सायलीला आपल्या मानतील भावना कळतील, याच आशेवर तो अजूनही आहे. आपण जर सायलीला मनातील भावना सांगितल्या, तर ती आपल्या आयुष्यातून निघून जाईल, अशी भीती अर्जुनला वाटत आहे. त्यामुळे अर्जुनने याबाबतीत मौन राखणच योग्य समजलं आहे. तर, दुसरीकडे सायली अर्जुनने प्रेमात पडावं आणि लग्न करून संसार थाटावा, एकटं राहू नये म्हणून त्याची मनधरणी करत आहे.

Source link