
तेलंगणातील नामपल्ली रेल्वे स्थानकाजवळ चारमिनार एक्स्प्रेसच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात सुमारे 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हैदराबादहू रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नईला जाणाऱ्या चारमिनार एक्स्प्रेसच्या तीन बोगी तेलंगणातील नामपल्ली रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून ( charminar express derails) घसरल्या. या घटनेत सुमारे 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चारमिनार एक्स्प्रेस नामपल्ली स्थानकाजवळ थांबत असताना हा अपघात झाला. त्यावेळी दरवाजाजवळ उभे असलेले पाच जण जखमी झाले. या अपघातात अन्य कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.
हे सुद्धा वाचा
रेल्वेबोगी फलाटावर आदळल्या
दक्षिण मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, डबे रुळावरून घसरले आणि त्यावेळी ट्रेनच्या दाराजवळ उभे असलेल्या लोकांना किरकोळ दुखापत झाली. सर्व जखमींना रेल्वे रुग्णालयात पाठवून उपचार करण्यात आले आहेत. ट्रेन थांबण्याच्या प्रक्रियेत असताना काही बोगी प्लॅटफॉर्मवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.








