संवर्ग दोनमध्येही शिक्षकांची ‘जादा अंतर’ हेराफेरी!

0
5
संवर्ग दोनमध्येही शिक्षकांची ‘जादा अंतर’ हेराफेरी!

सातारा :- “संवर्ग एक”मधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या कारनाम्यानंतर आता “संवर्ग दोन”मधील शिक्षक दांपत्यांची अंतराच्या दाखल्यात हेराफेरी करत बदली मिळवण्याची साखळी उघड झाली आहे. माण तालुक्यातील सात शिक्षक दांपत्यांनी ३० किमीपेक्षा जास्त अंतर असल्याचे भासवणारे जादा दाखले जोडून चुकीच्या पद्धतीने बदलीचा लाभ घेतल्याची गंभीर माहिती उजेडात आली आहे.

सदर प्रकरणांमध्ये बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून जादा अंतराचे दाखले मिळवण्यात आले आहेत. या कारवायेमुळे जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झाले असून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. काही शिक्षकांनी तर अगदी मायक्रो प्लॅनिंग करत ३० किमीपेक्षा अधिक अंतराचा दाखला तयार करून शाळा मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.