
Tanishaa Mukerji Accident Memories: बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या तिच्या ‘झलक दिखला जा ११’ या शोमुळे चर्चेत आली आहे. या शोमध्ये तनिषा सध्या आपला जलवा दाखवत आहे. या दरम्यान ती अनेक मुलाखती देखील देत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तनिषा मुखर्जी हिने आपल्या पहिल्या चित्रपटाची एक कटू आठवण सांगितली आहे. पहिल्याच चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातामुळे तिचा जीव देखील धोक्यात आला होता.







