फलटण– फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रविवार, दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १२, १४, १६, १८ व २० वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धांचा शुभारंभ रविवार, दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून विविध धावण्याच्या शर्यती, लांबउडी व गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
🔹 २० वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, १६०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १८ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, १००० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १६ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १४ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १२ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ३०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
स्पर्धकांनी नावनोंदणीसह प्रवेश फी ३० रुपये जमा करून आपले चेस्ट नंबर दि.२० ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत मुधोजी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातून घ्यावेत. प्रत्येक खेळाडूस जास्तीत जास्त दोन क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेता येईल. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी –
जनार्दन पवार (मो. ९२८४७६५९९५), नामदेव मोरे (मो. ९९६००८२१२०), ॲड. रोहित अहिवळे (मो. ७४९९५३७९३७), राज जाधव (मो. ९२२६१३९६५३), तायाप्पा शेंडगे (मो. ९३२२७४८१९९), धीरज कचरे (मो. ८३९०९९१९९९), सुहास कदम (मो. ७०८३७२०५२०), सूरज ढेंबरे (मो. ८८०५७७७९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.