
मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. मात्र, चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यातच आता चाहते दयाची वाट बघत असताना, जर दया परतली नाही, तर सगळ्यांचीच निराशा होणार आहे. निर्मात्यांनी टीआरपीसाठी असा खेळ करू नये, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तर, आता दयाबेन परत आली नाही तर, आम्ही मालिका बघणं बंद करू, असे देखील काही चाहते म्हणत आहेत.







