
चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या सतत चर्चा रंगलेल्या असतात. आजकाल अनेक कलाकारा हे त्यांच्या नात्याविषयी उघडपणे बोलतात. मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत होता. हे कपल सर्वांचे लाडके कपल होते. मात्र, अचानक दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. दोघांनीही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न केले. आता सुयशने पहिल्यांदाच अक्षयासोबतच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.








