
suicide attack in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथील पोलिस ठाण्यावर आज (दि.१२) आत्मघाती हल्ला करण्यात आला. यामध्ये सुरक्षा दलाचे ४ जवान ठार झाले. तर २८ नागरीक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खानमधील स्थानिक पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए- जिहाद पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.







