
Suhas Khamkar In Marathi Movie : पोलिस अधिकाऱ्यांना ध्येय प्राप्तीसाठी केलेले कठोर परिश्रम आणि त्यासाठीचा संघर्ष हाच त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. अशाच एका नायकाच्या प्रेरणादायक गोष्टीला’राजवीर’ या चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात लढा देणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या धाडसी प्रवासाची कथा या चित्रपटात पाहता येणार आजे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटातून बॉडीबिल्डर सुहास खामकर चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे.








