
SSC Hall Ticket 2025 : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार या बाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकिट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच २० फेब्रुवारीला ऑनलाइन दिली जाणार आहे.