
होळीची मजा वर्षानुवर्षे मनात घर करून राहते. या दिवशी मित्रमैत्रिणी रंगवायचे असो किंवा गाणे, नाचणे असो, प्रत्येक क्षणाची स्वतःची मजा आणि आनंद असतो. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. तेही होळी साजरी करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी गौरीसोबत अजब स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे.