
Disha Salian Death Case SIT : हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान हीच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात येईल याची माहिती दिली होती. राज्य सरकारने आज या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही समिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली जाणार आहे.






