
अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित, ‘सिर्फ एक बंदा कोफी है’ या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरुवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर मनोज बाजपेयीने साकारलेले पात्र, कोर्टात या मुलीसाठी लढतो आणि प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट २३ मे रोजी झी ५वर रिलीज होणार आहे.








