Tuesday, September 15, 2026
Homeसाताराश्रीमंत रामराजेंची सत्तेच्या लालसेसाठी पक्षांतराची खेळी: रणजितसिंह नाईक निंबाळकरांची घणाघाती टीका

श्रीमंत रामराजेंची सत्तेच्या लालसेसाठी पक्षांतराची खेळी: रणजितसिंह नाईक निंबाळकरांची घणाघाती टीका

फलटण: “श्रीमंत रामराजे यांचा महायुतीला सोडण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीतच घेतला होता. मात्र बाहेर पडताना त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर ठपका ठेवून जायचे ठरवले,” अशी तीव्र टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. फलटण-बारामती रेल्वे मार्गाची पाहणी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.

ते म्हणाले, “शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सामील होताना श्रीमंत रामराजे यांना पदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पद न मिळाल्याने ते नाराज झाले होते आणि आता पवार साहेबांच्या सोबत परत जात आहेत.”

आगामी विधानसभेत पराभव निश्चित
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढे म्हटले, “श्रीमंत रामराजे सत्तेवर राहण्यासाठी नेहमीच पक्षांतर करतात, पण फलटण-कोरेगावच्या जनतेला त्यांच्या ढोंगीपणाचे राजकारण कळले आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी आगामी विधानसभेत त्यांचा पराभव अटळ आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments