
मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या श्रेयस तळपदे याच्यासाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. या दरम्यान अभिनेत्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. मात्र, या सगळ्यावर मात करून अभिनेता आपल्या रोजच्या आयुष्यात परतला आहे. आता पुन्हा एकदा श्रेयस तळपदे आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. या दरम्यान अभिनेत्याने आपला वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याच्या मुलीने त्याला एक खास सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे.







