
आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे श्रेया घोषाल. आज १२ मार्च रोजी श्रेयाचा वाढदिवस आहे. तिचा जन्म दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात झाला. श्रेयाने ‘सारेगमप’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. तिने हा शो जिंकला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. तिने आजवर मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी आणि काही भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चक्क एका देशात ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो. चला जाणून घेऊया हा देश कोणता आहे.






