Friday, September 4, 2026
Homeफलटणफलटणमध्ये आज मंत्री भरत गोगावले व योगेश कदम यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत

फलटणमध्ये आज मंत्री भरत गोगावले व योगेश कदम यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत

फलटणमध्ये आज मंत्री भरत गोगावले व योगेश कदम यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत

फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले तसेच गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यानिमित्त आज, शुक्रवार (दि. ४ सप्टेंबर) रोजी फलटण येथील नाना पाटील चौकात शिवसेनेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम यांचे सकाळी ९.३० वाजता, तर रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले यांचे सायंकाळी ५.३० वाजता नाना पाटील चौक येथे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या स्वागत कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी आमदार दीपक चव्हाण आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक विराज खराडे व तालुका प्रमुख नानासो इवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments