
Shirur Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट एका बाजूला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव यांच्यात लढत होणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु आता शिरुरच्या सामन्यात महादेव जानकर यांनी एन्ट्री मारल्याची माहिती समोर आली आहे.







