
त्यावेळी शिखाने त्यांना दुसऱ्या सीटवर बसण्याची विनंती केली. मात्र, या तरुणांनी शिखासोबतच बाचाबाची करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी अभिनेत्रींच्या आईला काही आक्षेपार्ह प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना उत्तर देण्यासाठी पुढे आलेल्या शिखासोबत देखील त्यांनी अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिखाने या युवकाच्या कानशिलात लगावली. तर, शिखाच्या मदतीला यावेळी मेट्रोतील सहप्रवासी देखील धावून आले. ही सगळी घटना शिखा मल्होत्राने माध्यमांना सांगितली आहे.







