
सोशल मीडियावर राघव आणि शहनाजचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर ते दोघे लिव इनमध्ये राहात असल्याचे म्हटले जात आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी राघव आणि शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये राघव आणि शहनाज भारती सिंहच्या मुलाला भेटण्यासाठी गेल्याचे दिसत होते. शहनाज आणि राघवला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. सोशल मीडियावर #RagNaaz हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.








