
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शोच्या चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पण, चॅनलने असे कोणतेही वृत्त फेटाळून लावले आहे. याशिवाय, शोच्या शूटिंगसाठी परदेशात जायला लागणार होते. यामुळे शिजान खानने कोर्टाकडे त्याचा पासपोर्ट परत मागितला होता. यावरही वनिता यांनी संताप व्यक्त केला आहे. एका गंभीर प्रकरणातील आरोपींना आपल्या शोमध्ये सामील करून ही वाहिनी जगाला काय संदेश देऊ इच्छित आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.