Shashank Ketkar: चक्क मराठी मालिकेचे शुटिंग परदेशात, शशांक केतकरने शेअर केला फोटो

0
11
Shashank Ketkar: चक्क मराठी मालिकेचे शुटिंग परदेशात, शशांक केतकरने शेअर केला फोटो


परदेशातील शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना शशांक म्हणाला, ‘मला झोकून देऊन काम करायला आवडतं. प्रोजेक्ट कुठलंही असो मी माझे शंभर टक्के देतो. जेव्हा स्टार प्रवाहसारखी वाहिनी, पॅनोरमा सारखं प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम जेव्हा मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी सहकार्य करतात तेव्हा माझीही जबाबदारी असते की मी देखिल माझ्या टीमला संपूर्ण सहकार्य करायला हवं. त्यामुळेच मुरांबा मालिकेचे काही सीन्स मी परदेशातून माझ्या मोबाईलवरुनच शूट करायचं ठरवलं. मालिकांचं बरचसं शूटिंग मुंबईमध्ये होतं. परदेशातलं लोकेशन जर मालिकेत दिसलं तर प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असते. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी मी मुरांबा मालिकेसाठी काही सीन्स शूट करुन पाठवतोय. मायदेशी मी लवकरच परतणार आहे.



Source link