
शर्मिला यांनी चित्रपट निर्मात्यांना फोन करुन एका रात्रीतून मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनी पोस्टर लावण्यात आले त्या त्या ठिकाणाहून ते हटवण्यास सांगितले. शाही कुटुंबाचा असणारा रुबाब आणि मोठ्यांच्या समजुती लक्षात घेतच त्यांनी हे पोस्टर हटवण्यास सांगितले होते. शर्मिला यांनी मन्सूर यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांमध्ये शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न झाले.








