
Happy Birthday Sharman Joshi: बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी आज (२८ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहे. शर्मन जोशी याने १९९९मध्ये आलेल्या ‘गॉडमदर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले. पण, त्याला हवी ती ओळख मिळवता आली नाही. यानंतर शर्मन जोशीला ‘एक्सक्यूज मी’ हा चित्रपट मिळाला आणि हा चित्रपट अभिनेत्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटानंतर शर्मन जोशीने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. परंतु, त्यानंतर त्याने सहाय्यक भूमिकांमध्येच आपले नशीब आजमावले. चला जाणून घेऊया त्याच्या अशाच काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल…








