
स्नेहने व्यक्त केल्या मनातील भावना
वडिलांसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.”