Shah Rukh Khan Look: ५१ लाखांचं घड्याळ, ५ लाखांचं जॅकेट; शाहरुख खानच्या ‘या’ लूकमध्ये घेता येईल आलिशान घर!

0
16
Shah Rukh Khan Look: ५१ लाखांचं घड्याळ, ५ लाखांचं जॅकेट; शाहरुख खानच्या ‘या’ लूकमध्ये घेता येईल आलिशान घर!


Shah Rukh Khan Luxurious Look: बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेता आता शाहरुख खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान नुकताच दुबईमध्ये पोहोचला होता. यावेळी शाहरुख खानच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खानच्या या लूकची भरपूर चर्चा रंगली होती. दुबईच्या या इव्हेंटमध्ये शाहरुखने अतिशय लक्झरी गोष्टी परिधान केल्या होत्या. या लूकमध्ये त्याने ५१ लाखांचं घड्याळ आणि ५ लाखांचं जॅकेट परिधान केलं होतं. शाहरुख खानने परिधान केलेल्या इतर गोष्टींच्याही किंमती समोर आल्या आहेत.



Source link