
तसेच शालेय जीवनात लैंगिक शिक्षणाचे ध़डे देण्याची गरज असल्याचंही मत कोलकाता उच्च न्यायालयानं नोंदवलं.
कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court ) एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील याचिकेवर सुनावणी करताना मुलामुलींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावं, असा सल्ला कोलकाता हायकोर्टानं दिला आहे. तर, मुलांनाही मुलींच्या स्वाभिमानाच आदर केला पाहिजे, असं म्हण्टलं.
हे सुद्धा वाचा
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी सत्र न्यायालयाने एका मुलाला अल्पवयीन प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात तरुणाने याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणी करताना, न्यायालयाने मुलामुलींना काही मार्गदर्शक बाबी सांगितल्या. भारतात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने लैंगिक संबंधासाठी दिलेली संमती वैध मानली जात नाही आणि त्यांच्यासोबत निर्माण झालेले संबंध हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्ट (POCSO) अंतर्गत बलात्काराच्या समतुल्य आहे.









