Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGoogle Pay | Google Pay वर मिळणार भारतीयांना दिवाळीचा बोनस, गुगल पे...

Google Pay | Google Pay वर मिळणार भारतीयांना दिवाळीचा बोनस, गुगल पे युजर्सला घेता येईल लोन | Navarashtra (नवराष्ट्र)

Google Pay | Google Pay वर मिळणार भारतीयांना दिवाळीचा बोनस, गुगल पे युजर्सला घेता येईल लोन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Google Pay वर मिळणार भारतीयांना दिवाळीचा बोनस, गुगल पे युजर्सला घेता येईल लोन

बाजारात अनेक फेक लोन अप्स आहेत. त्यावर आता गूगलच्या या घोषणेनंतर आळा घाळण्यास मदत होईल.

Google Pay : नुकत्याच गूगल फॉर इंडिया कंपनीने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कंपनीने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या मोठ्या लोन्सपर्यंतच्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने या छोट्या लोन्सना ‘सॅशे लोन’ असे नाव दिले आहे. यूजर्स या लोनचा फायदा गुगल पे (Google Pay) च्या मदतीने घेऊ शकतात. याचसंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गूगल इंडियाने ही सर्व्हिस लाँच करताना असे सांगितले होते की, भारतात छोटेखानी व्यवसायिकांना वेळोवेळी अशा लोनची गरज पडते. त्यासाठी कंपनी सॅशे लोन लाँच करणार आहे. याअंतर्गत कंपनी १५ हजार रूपयांपर्यंतचे लोन देते. ज्याची इएमआय फक्त १११ रुपयांपासून सुरु होईल.

बाजारात अनेक फेक लोन अप्स आहेत. त्यावर आता गूगलच्या या घोषणेनंतर आळा घाळण्यास मदत होईल. असे अॅप्स बेकायदेशीरपणे लोन देतात आणि नंतर वसूली करतात. गूगलच्या या सर्व्हिस अंतर्गत लोकांना अधिकृतपणे पैसे मिळतील. कंपनी हे लोन त्यांच्याकडून थेट ग्राहकांना देणार नाही. तर कंपनी यात एक माध्यम म्हणून काम करेल. कंपनीने DMI फायनांससोबत पार्टनरशिप केली आहे. यासोबतच Google Pay ने एक क्रेडिट लाइनसुद्धा इनेबल केली आहे, जी व्यापाऱ्याची मदत करेल. यासाठी कंपनीने ePayLater सोबत पार्टनरशिप केली आहे. व्यापारी सगळ्याच ऑनलाइन आणि ऑफलाइन डिस्ट्रीब्यूटरसाठी याचा वापर करून स्टॉक आणि सप्लाय विकत घेऊ शकतात.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments