Wednesday, September 16, 2026
HomeUncategorizedआर्थिक हव्यासापोटी साखरवाडीत दुकानदारांकडून चायनीज माज्यांची गुपचूप विक्री !

आर्थिक हव्यासापोटी साखरवाडीत दुकानदारांकडून चायनीज माज्यांची गुपचूप विक्री !

साखरवाडी : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी लहान मोठ्या पक्ष्यांना पंखाना गंभीर दुखापत होऊन आपला जीव गमवावा लागतो. पक्षांप्रमाणे सायकलस्वार, शाळकरी मुले, मुली, दुचाकीस्वार तसेच दुचाकीवर पुढे बसवलेली लहान मुले यांना चायनीज मांजा कापून गंभीर दुखापत होऊन काहींना मागील काळात आपला जीव गमावा लागला आहे

फलटण शहरासह तालुक्यात बंदी असलेल्या चायनीज मांजाचा साखरवाडीत उत्साही लहान शाळकरी मुले व कॉलेज युवकांकडून पतंग उडवण्यासाठी सर्रास वापर केला जात आहे. मागील वर्षी फलटण शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावात या धोकादायक चायनीज मांजा कापल्याने पक्षी, वाहनचालकांना गंभीर दुखापत झाली होती याबाबत फलटण शहर पोलिसांनी कारवाई करत शहरातील काही दुकानांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले होते मात्र तरीसुद्धा फलटण तालुक्यात चायनीज मांजाचा वापर थांबताना दिसत नाहीये

चायनीज मांजाची जाडी सामान्य दोऱ्यापेक्षा अतिशय कमी असते सामान्य दोरा थोडासा ताण बसला की तुटतो मात्र चायनीज मांजामध्ये नायलॉनच्या वापर असल्याने तो सहजा सहजी तुटत नाही त्यात तो विविध रंगांमध्ये उपलब्ध होत असल्याने रस्त्याच्या कडेला झाडावरून किंवा विद्युत तारेवरून रस्त्यावर लोंबत असताना दुचाकीवरून, सायकलवरून जाताना सहजासहजी तो दिसत नाही परिणामी दुचाकी व सायकलस्वारांना तोंडाला, गळ्याला, कानाला अडकल्यावरच समजते मात्र काही कळायच्या आत चायनीज मांजा शरीराला गंभीर इजा करतो याबाबत पोलिसांनी अनेकदा आवाहन करून सुद्धा काही दुकानदार किरकोळ पैशाच्या हव्यासापोटी या चायनीज मांजाची गुपचूप विक्री करीत असून काही उत्साही शाळकरी मुले व कॉलेज युवक पतंग कापा कापीच्या शर्यतीमध्ये याचा वापर करत आहेत यावर पोलिसांनी दुकानदारांबरोबर पतंग उडवताना चायनीज मांजा आढळून आल्यास संबंधित मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments