आर्थिक लाभापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचे: ‘राईट टू लव्ह’च्या संघर्षातून मिळवले समाधानाचे अनमोल अनुभव

0
1
आर्थिक लाभापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचे: ‘राईट टू लव्ह’च्या संघर्षातून मिळवले समाधानाचे अनमोल अनुभव

पुणे :-“कधी कधी आयुष्यात आर्थिक फायद्यापेक्षा काही गोष्टी अधिक मूल्यवान असतात, त्यापैकी समाधान ही एक!” असं सांगत एक अनोखा अनुभव मांडत आहेत ‘राईट टू लव्ह’ अभियानाचे कार्यकर्ते. गेल्या काही महिन्यांपासून अनेक ‘राईट टू लव्ह’ केसेस हाताळताना त्यांना मानसिक समाधानाचा एक अनोखा अनुभव मिळत आहे.

सामाजिक भिंतींना पार करत, प्रेमाच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या संघर्षात साथी बनण्याचं काम हे त्यांच्यासाठी केवळ एक जबाबदारी नाही, तर आत्मसंतुष्टीची एक अनुभूती आहे. आर्थिक फायद्यांपेक्षा या केसेस हाताळताना मिळालेलं समाधान त्यांना मोठं बळ देत आहे. समाजातील पायंडे मोडण्यासाठी आणि संघर्ष करणाऱ्यांसाठी आधार बनण्याचा हा प्रयत्न त्यांना ‘सुकून’ देतोय.

“आपल्या कामामध्ये नुसताच आर्थिक फायदा नव्हे, तर मानसिक समाधान मिळणं आवश्यक आहे. तेच समाधान आयुष्यभर मिळत राहो,” अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे.