Sunday, October 11, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा फलटण दौरा: विकासकामांवर चर्चा व...

सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा फलटण दौरा: विकासकामांवर चर्चा व शासकीय योजनेचा आढावा

फलटण :- सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज फलटण तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन तालुक्याच्या विकासकामांबाबत चर्चा केली. या वेळी आमदार सचिन पाटील, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, माजी जि.प. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, धनंजय साळुंखे-पाटील, व अभिजित नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत शासकीय योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यांनी तरडगाव येथील पालखीतळ व फलटण पालखीतळ येथे पाहणी केली. जिल्हा परिषद शाळा माझेरी आणि माझेरी अंगणवाडीस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच, पालखीतळ बरड, प्राथमिक आरोग्य केंद्र बरड, साधुबुवाचा ओढा येथे पालखी विसावा केंद्रांची पाहणी केली. धुमाळवाडी या फळ उत्पादनासाठी प्रसिद्ध गावात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दौऱ्यामुळे फलटण तालुक्यातील शासकीय योजनांचा अंमल आणि विकासकामांवर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments