Satara : मोठी बातमी! कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त

0
1


Satara Crime News : कराडच्या (Karad) पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (डीआरआय विभागाने) मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. डीआरआय विभागाने ड्रग्स (Drugs Case) बनवले जात असलेले कोंबड्यांचे शेड सील केल असून याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बाबा मोरे याला ताब्यात घेतला आहे. या ठिकाणाहून डीआरआय (DRI) पथकाने अंदाजे 55 कोटीचा अमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल व साहित्य ताब्यात घेतले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. (Satara Drugs Case)

दरम्यान, ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्यानं ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केलं होतं. डीआरआय विभागानं केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलीसही अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे.

Satara Drugs Case : तब्बल 55 कोटीचा ड्रस तयार, हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ड्रग्स तयार केलं जात होतं. सध्या 55 कोटीचा ड्रस हा तयार होता आणि हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कच्चामालातून एमडी ड्रग्स बनवला गेला असता तर हजारो रुपयांचा ड्रग्स तयार झाला असता. वेळीच पुण्यातील DRI विभागाच्या पथकाने या शेडवर धाड टाकून मोठा ड्रग्सचा साठा ताब्यात घेतला आहे.

Karad Drugs Case: कारवाईसाठी थेट गुजरात आणि हैदराबादवरून पथक कराडमध्ये

दरम्यान, नक्की या ठिकाणी कोणतं अमली पदार्थ तयार केलं जात होतं याबाबत सातारा जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू असून या कारवाईची माहिती सातारा आणि कराड पोलिसांना नसल्याचेही समोर येत आहे. तर कारवाईसाठी आलेले पथक हे गुजरात व हैदराबाद वरून आल्याचं समजत असून एकूण कारवाई विषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. परिणामी तपासाअंती या प्रकरणाचीअधिकृत माहिती कळू शकणार आहे. मात्र या घटनेने परिसर एकच खळबळ उडाली असून तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

आणखी वाचा



Source link