
आता दसऱ्याच्या निमित्ताने उमा ओवीला कोकणातील संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणार आहे. दसऱ्याला सरस्वती मातेची पूजा का करतात, असा प्रश्न ओवीला पडला होता. या आधी तिने परदेशात असा कोणताही सण पाहिला नव्हता. त्यामुळे तिला या सगळ्याचे कौतुक वाटत आहे. आता ती उमाला सरस्वती पूजनाचं महत्त्व विचारणार आहे. यावेळी उमा तिला या मागची कथा आणि महत्त्व सांगणार आहे. ‘सरस्वतीची पूजा केली की लक्ष्मी आपोआप मिळते. सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे. तिच्या असण्यानेच सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात’, असे उमा ओवीला समजावून सांगणार आहेत.








