
त्यापाठोपाठ काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साराचे हेलिकॉप्टर सकाली १० वाजता तेथे उतरवण्यात आले होते. प्रतिबंधित भागात हेलिकॉप्टर उतरवल्याचा व्हिडीओ समोर आला असून वन विभागाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्री सारा अली खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








