Santosh Chordiya: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे निधन; ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
12
Santosh Chordiya: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे निधन; ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Santosh Chordiya Passes Away: आज मनोरंजन विश्वासाठी अतिशय दुःखद दिवस आहे. एकाच दिवशी मनोरंजन विश्वातील तीन प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते रवींद्र बेर्डे, हॉलिवूड स्टार आंद्रे ब्राउगर यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या ५७व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने मंगळवारी (१३ डिसेंबर) सकाळी त्यांचे निधन झाले आहे. ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेतून त्यांनी एकपात्री प्रयोग करणाऱ्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणले होते. आपल्या विनोदी एकपात्री प्रयोगांनी त्यांनी सगळ्यांनाच भरपूर हसवले होते.



Source link