Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही

0
3


Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही

आमदार महेश शिंदेंबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्यवेळी निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. महेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला हाताशी धरून जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची आधीच माहिती दिली होती, त्यांनी बोलावल्यास त्यांना भेटायला जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेश शिंदे यांनी दिली. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केला आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हता. त्या प्रकारानंतर आमदार शिंदे यांना समजही देण्यात आली होती. तरीही त्यांचं स्टेटमेंट देणं काही बदलेलं नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यावर लवकर निर्णय घेतील असा दावा संजय शिरसाटांनी केला. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला बोलावतील, त्या दिवशी मी नक्की जाणार. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर आधीही मांडली आहे आणि आताही मांडू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला डायरेक्ट फोन करतील.”



Source link