
सांगोल्यामधून एका भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. पंढरपूर-कराड मार्गावर सांगोला तालुक्यात भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातून काम करून घराकडे जाताना महिलांवर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत पाच महिला जागीच ठार झाल्या.







