Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!

0
12
Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!


मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. ‘ट्यूबलाईट’, ‘भारत’, ‘राधे’, ‘अंतिम’ अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र, त्याच्या यंदा रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, एकंदरीत सध्याचं चित्र पाहता, या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील यात शंकाच आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link