Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!

0
8
Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!


आरोपी मुलाने फोनवर सांगितले होते की, तो येत्या ३० एप्रिलला सलमान खानला मारणार आहे. सध्या याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. कारण आरोपी अल्पवयीन असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत असून, त्याने हा फोन का केला असावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी काल रात्रीच हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवले होते. धमकीचा हा फोन आल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आतच पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. आता या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



Source link