Salaar Box Office Collection: ‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! अवघ्या ५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

0
13
Salaar Box Office Collection: ‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! अवघ्या ५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!


Salaar Box Office Collection Day 5: अभिनेता प्रभास याचा ‘सालार’ हा चित्रपट नुकताच तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ‘सालार’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ९०.७० कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी या कमाईत मोठी घसरण झाली होती. या चित्रपटाने ५६.३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी अर्थातच विकेंडला कलेक्शनचा आलेख पुन्हा वर गेला. वीकेंडला या चित्रपटाने ६२.०५ कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशीही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ४२.५० कोटींचा व्यवसाय केला. आता ‘सालार’च्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.



Source link