Sajid Khan Death : ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचं निधन; ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
14
Sajid Khan Death : ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचं निधन; ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Actor Sajid Khan Passed Away: ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून साजिद खान कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. २२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या निधनाची माहिती ही आता समोर आली आहे. केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील कायमकुलम टाउन जुमा मशिदीत साजिद खान यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अभिनेते साजिद खान यांचा एकुलता एक मुलगा समीर याने याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.



Source link