Tuesday, September 15, 2026
Homeसातारासचिन कांबळे-पाटील यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय ?

सचिन कांबळे-पाटील यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय ?

फलटण :  माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू शिलेदार आणि भारतीय जनता पार्टीचे फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली होती. मात्र, जर भाजपचे अधिकृत तिकीट मिळाले नाही किंवा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची वेळ आली, तर कांबळे पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असा दबाव कार्यकर्त्यांमधून निर्माण झाला आहे.

यासंदर्भात उद्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजप आणि खासदार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची गोपनीय बैठक फलटणमध्ये होणार असल्याची माहिती आहे. मात्र, बैठक कुठे आणि केव्हा होणार, याबद्दल कार्यकर्त्यांनी पूर्ण गोपनीयता राखली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments