
पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी ऋषी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खुलासा केला की, त्यांना हा पुरस्कार प्रतिभेमुळे नाही, तर पैशामुळे मिळाला होता. अभिनेते ऋषी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले होते की, ‘बॉबी’साठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर अमिताभ बच्चन निराश झाले होते. त्यांना वाटले होते की, हा पुरस्कार ‘जंजीर’साठी त्यांना नक्कीच मिळेल. दोन्ही चित्रपट एकाच वर्षी प्रदर्शित झाले होते. मात्र, तो पुरस्कार मी विकत घेतला होता, हे सांगायला मला आता शरम वाटते. खरं तर त्यावेळी मी काही विचार केला नव्हता.







