
रिंकू राजगुरू हे नाव आज अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहित आहे . अर्थात पहिल्याच सिनेमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने तिच्या कामाची पोचपावती सुद्धा दिली होती . ‘सैराट’सारख्या वास्तववादी चित्रपटात काम करत रिंकूने सर्वांची मने जिंकली. रिंकूच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकताच रिंकूने स्वत: खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.








