Republic Day 2024 | दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा खास चित्ररथ; छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना | Navarashtra (नवराष्ट्र)

0
12
Republic Day 2024 | दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा खास चित्ररथ; छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना | Navarashtra (नवराष्ट्र)


दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा खास चित्ररथ; छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र हा खास चित्ररथ सादर करण्यात आला. “लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला.

दिल्ली : आज देशभर सर्वत्र उत्साहामध्ये अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा केला जात आहे. सर्वत्र ध्वजवंदन आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील (Delhi) कर्तव्यपथावर होणारा सोहळा प्रजासत्ताक दिनाचे खास आकर्षण ठरत असतो. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानाच्या (PM Narendra Modi) साक्षीने पार पडणार नेत्रदीपक सोहळा (Republic Day Parade) आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतो. यावेळी विविध परेडसह साहसी प्रात्यक्षिके केली जातात. त्याचबरोबर भारताची विविधेतून एकता दर्शवणारे राज्यांचे चित्ररथ (Chitrarath) देखील सामील झालेले असतात. यावर्षी महाराष्ट्राचा देखील कर्तव्यपथावर भव्य असा चित्ररथ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) खास मानवंदना देणारा महाराष्ट्राचा चित्ररथ होता.

दिल्लीच्या कर्तव्यपथावर वेगवेगळ्या राज्याच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होत असते. विविधतेतून एकता जपणारे भारताचे हे जणू एक प्रतिबिंबच असते. हा सोहळा संपूर्ण देशाभरासाठी उत्साह निर्माण करणार असतो. सैन्याच्या विविध तुकड्यांचे संचलन तसेच परेड व प्रात्यक्षिके डोळे दिपवणारी असतात. यामध्ये एक मह्त्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य मांडणारे खास चित्ररथ. हे चित्ररथ त्या त्या राज्याची खासियत, परंपरा आणि इतिहास याचे दर्शन घडवत असते. या चित्ररथामुळे आपला भारत देशाची समृद्ध वारसा आणि परंपरा जगासमोर येते. या चित्ररथाच्या पंरपरेमध्ये आपला महाराष्ट्र देखील आपली वेगळी ओळख जपत आणि वाढवत असतो. यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक दिनाच्या या खास चित्ररथातून मानवंदना देण्यात आली.






Source link