Republic Day 2024 | राज्यात 18 जणांना मिळणार शौर्य पुरस्कार; पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Republic Day 2024 | राज्यात 18 जणांना मिळणार शौर्य पुरस्कार; पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)


महाराष्ट्रातील 78 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात करंदीकर यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 753 अधिकान्यांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर केले आहेत. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी पोलिस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील 1132 कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक जम्मू-काश्मीर या राज्यातील एकूण 72 पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यात महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश आहे.

नक्षल प्रभावित भागातील 119 जणांचा समावेश करण्यात आला आहे. 277 शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी सर्वाधिक 119 कर्मचारी नक्षलवाद प्रभावित भागात तैनात आहेत. 133 जवान जम्मू-काश्मीर भागातील आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्रातील 25 जवानांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.






Source link